कृष्णा परि सावळा तो
कृष्णा परि सावळा तो, पक्षा परि स्वच्छंद तो। दिसायला अगदी साधा तो,वागायला अगदी सरळ तो। माहित नाही मनाने कसा आहे तो? बेरीज-वजाबकिचा दुनियेत सदा असतो बुडलेला, तरी माणूसकीच्या नात्यातुन नाही तो दूर सरलेला। अदा त्याची न्यारी,रुबाब त्याचा भारी, संकटाच्या वेळी तो सर्वांना देवासमान तारी। डोक्यात त्याचा घोळतात विचार हजार पण तरी घरा साठी वेळ कढतो तो चिकार. नसे कधी तो कामचुकार। खंत एवढीच जडलेत त्याला व्यसनांचे विकार। चंद्रा परि सौम्य तो,चंदना परि झिजतो तो, सर्वाची मने जाणतो तो , पण कळतच नहीं त्याचा मनाचा थांगपत्ता का लागुन देत नहीं तो? कळतच नाही नेमका कसा आहे तो.