Posts

तुझ पाहता भान हरपले सारे,

तुझ पाहता भान हरपले सारे, वाटू लागले तुझ्यापुढे गगन ठेंगे सार । आनंदाला करुन दिली आश्रुंनी वाट। मनात उसळली माझ्या प्रितीची लाट। हवाहवासा वाटू लागला वारा मंद होउन गेले मी माझ्याच धुंदीत धूंद । मी बावरले, घाबरले पण तुला पाहता क्षणीच सावरले जणू सर्व प्रश्नांची उत्तरे ही मौनातच मिळाले .

राब-राब राबती हात

राब -राब राबती हात वाटते मिळेल का कोणाची साथ ? असुसतात डोळे शोधाया मायेची एकाच थाप झाले मन कोरड-पाषाण सोसून रात्रं-दिवस घाव देवा अत्ता तरी घे धाव। झप-झप चालतात पाय शोधाया मानुसकिचे गाव दानव ही चढवतात सभ्यातेचे मुखवटे सर्वच दाखवतात एकमेकांकडे बोटे कळतच नाही कोण खरे कोण खोटे कोंडत चाललाय अत्ल्यात श्वास । वाटते भीती ठेवायला कोणावर ही विश्वास । करतात सर्वच एकमेकांचा द्वेष । मनात निर्माण झालाय क्लेश .

पहिला पाउस

पहिल्या पावसात मी चिम्ब भिजाव अलगदाच मग तू मला कवेत घ्याव। शब्दविनाच आपल संभाषण व्हाव तुज्या मिठीत मग माझ हिरदय शांत व्हाव। मोग्र्याचा सुवासत तू गुंतून जाव, आणी गुंतता गुंतता तू फ़क्त माझ वहाव्स । अवती - भवती तू आणी मी बाकी कोणी नसाव , मग जोरात कडाडणार्या विजेच ही भान नसाव । माझ्या कापर्या हताना ही मग तू धीर द्यावा । हा सारा असमंतच मग तुझ्यात भासावा .

मन

मन हे वेंधळ ,मन हे अंधळ , मन हे खुळ ,मन हे प्रेमाच तळ । मन हे अल्याड , थोड जगाचा पल्याड , थोडस हे भ्याड । मन हे फुलपाखरू ,मन कधी हे कल्पतरु । येते रोमरोम लगेच भरू , रोजच असते काहीतरी कहाणी सुरु । मन दरवळणारा निशीगंध ,मन ओढ लावणारा मातीचा सुगंध । मन हे स्वप्नांचे गाव , दिसती येथे कित्येक भाव । मन हे थोड़े बेधुंद ,मन हे स्वच्छंद । मन हे सप्तरंग ,विचारत असते नेहमी दंग । मन हे आयुष्याचे रण , उठतात इथे सुख़ाचे - दुःखाचे वण .

नेहमीच

नेहमीच जिंकणयापेक्षा एकदा हारून ही पहाव। स्वतासठी जगण्यापेक्षा दुसर्यासाठी थोड जगून बघाव। अगदी मोठ्या मनाने कधी शत्रूला ही माफ़ करून बघाव। साध-सरळ जगताना थोड बिन्दस्त जगून पहाव।कधी-कधी दुःख ही आनंदाने पेलुन बघाव। गोष्टी मानत साठवण्यपेक्षा कधी कोणाकडे मन मोकळ बोलून बघाव। पायात काटा रुतल्यावर कोणी चालन सोडून देत नाही। मग का बर हताश झाल्यावर कोणी जगन सोडून द्याव? हवी ती गोष्ट मिळाल्यावर त्याची किमत राहत नाही आणी त्याचा पेक्षा जास्त चांगली गोष्ट मिळण्याचा लोभ कधी सुटत नाही। दुखाचा डोंगर कोसळ्या शिवाय सुख कधी येत नाही आणी सुख आल्यावर त्याला न सोडण्या मोह कधी अवरत नाही। जेथे असते उन तेथेच येते सावली हे कोणी लक्ष्यातच घेत नाही.

आता पुन्हा ना ती अनाम ओढ

आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़। आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना ते निखळ मैत्रेचे बंध। विरत आहेत आता नकळत झालेले अनुबंध आता पुन्हा ना तो मोकळा श्वास । आता पुन्हा ना मानत कोणती आस। आता पुन्हा ना तो सावरणारा हात। विश्वास ठेवल्यावरच का होता घात। अन मनाला का पोहोचतो आघात। आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़.

कृष्णा परि सावळा तो

कृष्णा परि सावळा तो, पक्षा परि स्वच्छंद तो। दिसायला अगदी साधा तो,वागायला अगदी सरळ तो। माहित नाही मनाने कसा आहे तो? बेरीज-वजाबकिचा दुनियेत सदा असतो बुडलेला, तरी माणूसकीच्या नात्यातुन नाही तो दूर सरलेला। अदा त्याची न्यारी,रुबाब त्याचा भारी, संकटाच्या वेळी तो सर्वांना देवासमान तारी। डोक्यात त्याचा घोळतात विचार हजार पण तरी घरा साठी वेळ कढतो तो चिकार. नसे कधी तो कामचुकार। खंत एवढीच जडलेत त्याला व्यसनांचे विकार। चंद्रा परि सौम्य तो,चंदना परि झिजतो तो, सर्वाची मने जाणतो तो , पण कळतच नहीं त्याचा मनाचा थांगपत्ता का लागुन देत नहीं तो? कळतच नाही नेमका कसा आहे तो.