Posts

Showing posts from May, 2010

तुझ पाहता भान हरपले सारे,

तुझ पाहता भान हरपले सारे, वाटू लागले तुझ्यापुढे गगन ठेंगे सार । आनंदाला करुन दिली आश्रुंनी वाट। मनात उसळली माझ्या प्रितीची लाट। हवाहवासा वाटू लागला वारा मंद होउन गेले मी माझ्याच धुंदीत धूंद । मी बावरले, घाबरले पण तुला पाहता क्षणीच सावरले जणू सर्व प्रश्नांची उत्तरे ही मौनातच मिळाले .

राब-राब राबती हात

राब -राब राबती हात वाटते मिळेल का कोणाची साथ ? असुसतात डोळे शोधाया मायेची एकाच थाप झाले मन कोरड-पाषाण सोसून रात्रं-दिवस घाव देवा अत्ता तरी घे धाव। झप-झप चालतात पाय शोधाया मानुसकिचे गाव दानव ही चढवतात सभ्यातेचे मुखवटे सर्वच दाखवतात एकमेकांकडे बोटे कळतच नाही कोण खरे कोण खोटे कोंडत चाललाय अत्ल्यात श्वास । वाटते भीती ठेवायला कोणावर ही विश्वास । करतात सर्वच एकमेकांचा द्वेष । मनात निर्माण झालाय क्लेश .

पहिला पाउस

पहिल्या पावसात मी चिम्ब भिजाव अलगदाच मग तू मला कवेत घ्याव। शब्दविनाच आपल संभाषण व्हाव तुज्या मिठीत मग माझ हिरदय शांत व्हाव। मोग्र्याचा सुवासत तू गुंतून जाव, आणी गुंतता गुंतता तू फ़क्त माझ वहाव्स । अवती - भवती तू आणी मी बाकी कोणी नसाव , मग जोरात कडाडणार्या विजेच ही भान नसाव । माझ्या कापर्या हताना ही मग तू धीर द्यावा । हा सारा असमंतच मग तुझ्यात भासावा .

मन

मन हे वेंधळ ,मन हे अंधळ , मन हे खुळ ,मन हे प्रेमाच तळ । मन हे अल्याड , थोड जगाचा पल्याड , थोडस हे भ्याड । मन हे फुलपाखरू ,मन कधी हे कल्पतरु । येते रोमरोम लगेच भरू , रोजच असते काहीतरी कहाणी सुरु । मन दरवळणारा निशीगंध ,मन ओढ लावणारा मातीचा सुगंध । मन हे स्वप्नांचे गाव , दिसती येथे कित्येक भाव । मन हे थोड़े बेधुंद ,मन हे स्वच्छंद । मन हे सप्तरंग ,विचारत असते नेहमी दंग । मन हे आयुष्याचे रण , उठतात इथे सुख़ाचे - दुःखाचे वण .