Posts

Showing posts from March, 2010

आता पुन्हा ना ती अनाम ओढ

आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़। आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना ते निखळ मैत्रेचे बंध। विरत आहेत आता नकळत झालेले अनुबंध आता पुन्हा ना तो मोकळा श्वास । आता पुन्हा ना मानत कोणती आस। आता पुन्हा ना तो सावरणारा हात। विश्वास ठेवल्यावरच का होता घात। अन मनाला का पोहोचतो आघात। आता पुन्हा ना ती अनाम ओढ। आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़.