आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,
आनंदाचे क्षण मी वेचत असताना , हसत-हसत जगताना नकळत तू समोर येतोस , आणि मग माझ्या डोळ्यात तू पाणी अणतोस । मग पुन्हा तुझ्यासाठी व्याकुळ होते, पुन्हा तुझ्या आठवणीत गुंतते , पुन्हा मनातून खचते , पुन्हा वेड्यासारखी तुला शोधत बसते । मग सतत तुझी ओड मला सलत रहते । तू सुखात तर असशील ना ? ही एकच हुरहुर मनाला लागुन रहते । तू अवती-भोवती नसताना , तुझा चेहरा मला सारखा छळत राहतो । मनातला गोंधळ एकसारखा चालत राहतो । अगदीच मग मी गळून पड़ते 'एक सुखलेल्या फुलासारखी ' मग पुन्हा मीच मनाला आवरते, स्वताला सवारते। आणि पुन्हा मरत चालल्या मनाला उभारी देते । पुन्हा मग आनंदाचे क्षण मी वेचत असताना , हसत-हसत जगताना नकळत तू समोर येतोस , आणि मग पुन्हा माझ्या डोळ्यात तू पाणी अणतोस ।