जगाच्या मृगजळामागे धावता धावता

जगाच्या मृगजळामागे माणूस सतत धावतो ,

धावता धावता तो स्वतालाच विसरतो ।

स्वताच अस्तित्व निर्माण करता करता ,

छोटयातला छोटा सुखाचा क्षण ही तो गमावतो ।

खरे सुख शोधता शोधता तो कधी

लोभी बनतो हे त्याचे त्यालाच कळत नाही ।

आणी कळले तरी त्याला ते वळत नाही ।

प्रत्येक पायरी चढता चढता जगाचा विचार

तो आधी करतो ।

प्रत्येक वेळी तो स्वताचे अस्तित्व आहे

हे सिद्ध करण्यासाठी खटपट करतो ।

एक आकांशा पूर्ण होते न होते

ती दूसरी पूर्ण करण्यासाठी खटपट करतो ।

आणी शेवटी जगाच्या मृगजळामागे धावता धावता

त्याचा एक दिवस अंत होतो .

Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,