आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,


हसत-हसत जगताना


नकळत तू समोर येतोस ,


आणि मग माझ्या डोळ्यात तू पाणी अणतोस ।


मग पुन्हा तुझ्यासाठी व्याकुळ होते,


पुन्हा तुझ्या आठवणीत गुंतते ,


पुन्हा मनातून खचते ,


पुन्हा वेड्यासारखी तुला शोधत बसते ।

मग सतत तुझी ओड मला सलत रहते ।

तू सुखात तर असशील ना ?

ही एकच हुरहुर मनाला लागुन रहते ।

तू अवती-भोवती नसताना ,

तुझा चेहरा मला सारखा छळत राहतो ।

मनातला गोंधळ एकसारखा चालत राहतो ।

अगदीच मग मी गळून पड़ते

'एक सुखलेल्या फुलासारखी '

मग पुन्हा मीच मनाला आवरते,

स्वताला सवारते।

आणि पुन्हा मरत चालल्या मनाला उभारी देते ।

पुन्हा मग आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,
हसत-हसत जगताना
नकळत तू समोर येतोस ,
आणि मग पुन्हा माझ्या डोळ्यात तू पाणी अणतोस ।

Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन