मन

मन हे वेंधळ ,मन हे अंधळ ,
मन हे खुळ ,मन हे प्रेमाच तळ ।
मन हे अल्याड , थोड जगाचा पल्याड ,
थोडस हे भ्याड ।
मन हे फुलपाखरू ,मन कधी हे कल्पतरु ।
येते रोमरोम लगेच भरू , रोजच असते काहीतरी कहाणी सुरु ।
मन दरवळणारा निशीगंध ,मन ओढ लावणारा मातीचा सुगंध ।
मन हे स्वप्नांचे गाव , दिसती येथे कित्येक भाव ।
मन हे थोड़े बेधुंद ,मन हे स्वच्छंद ।
मन हे सप्तरंग ,विचारत असते नेहमी दंग ।
मन हे आयुष्याचे रण ,
उठतात इथे सुख़ाचे - दुःखाचे वण .

Comments

Popular posts from this blog

पहिला पाउस

आता पुन्हा ना ती अनाम ओढ