तो सम्राट होता पण.........
तो सम्राट होता, पण सर्व वेद-विद्या पारंगत नव्हता। होती कल्पक त्याची वृती, होती आनंदी त्याची सृष्टी । थोरामोठ्यांचा करी आदर, लहानांची करी तो कदर । हसवण्याची कला होती त्याला अवगत. कधी छोट्या छोट्या गोष्टीत होई त्याची फसगत । होता अगदी दिलदार , पण कामाच्या व्यापने कधी होई बेजार। न माने कधी कोणाला आपले आणी परके, त्याच्यासाठी सगळेच सारखे । कधी कधी तो घोळक्यात ही बसे , पण त्याची नजर चौफ़ैर असे। एक गोड सम्राञीचा मनात तो बसला होता, पण तिचा तो झाला नहीं कारण, त्यावेळेस सम्राटापेक्षा शिक्षणाचा पगडा भरी होता.

Comments