तो सम्राट होता पण.........
तो सम्राट होता,
पण सर्व वेद-विद्या पारंगत नव्हता।
होती कल्पक त्याची वृती,
होती आनंदी त्याची सृष्टी ।
थोरामोठ्यांचा करी आदर,
लहानांची करी तो कदर ।
हसवण्याची कला होती त्याला अवगत.
कधी छोट्या छोट्या गोष्टीत होई त्याची फसगत ।
होता अगदी दिलदार ,
पण कामाच्या व्यापने कधी होई बेजार।
न माने कधी कोणाला आपले आणी परके,
त्याच्यासाठी सगळेच सारखे ।
कधी कधी तो घोळक्यात ही बसे ,
पण त्याची नजर चौफ़ैर असे।
एक गोड सम्राञीचा मनात तो बसला होता,
पण तिचा तो झाला नहीं कारण,
त्यावेळेस सम्राटापेक्षा शिक्षणाचा पगडा भरी होता.
Comments