हे अस का असत ?

हे अस का असत ?

सत्याची बाजू पकड़नार्याला सुखाच जगन का नसत ?

हे अस का असत?

युगांयुगे हे असच चालत आल ,


सत्याला नेहमीच झगडाव लागल ।


सीतेला द्यावी लागली अग्निपरीक्षा ,


पांडवानाही भोगावी लागली वनवासची शिक्षा.


सोन्यालाही उजळून निघाव लागत ।


बराच वेळ हिरकणीलाही कोळशासोबतच रहाव लागत।


हे अस का असत?


सत्याची कास धरलेला सामान्य माणूस ,


जेथे असतो तेथेच राहतो ।


पापी मात्र सत्याचा मुखवटा चढवून


उघड मथ्याने फिरतो ।


सत्याला आशा असते


"पापाचा घडा एक दिवस भरणार,


त्याची चूक त्याला कळणार,


आणी एक दिवस पापाचा घडा फुटणार"


पण सत्याला न्याय मिळतामिळता


त्याच अर्ध आयुष्य निघून जात।


आणी त्याच आनंदाचे क्षण वेचण्याच


स्वप्न कोठेतरी हरवून जात .

Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,